पांढऱ्या रंगाचं ते फूल गोल गोल फिरत खाली येत होतं.. जणू काही पांढरा शुभ्र फ्रॉक घातलेली एखादी Ballerinaच एका पायावर गिरक्या घेत खाली येतेय. तो एकटक त्या उंच झाडावरून खाली पडणाऱ्या फुलांकडे बघत होता.
इतक्यात वाऱ्याची एक झुळूक आली! थंड वारा…केसांत शिरला, चेहऱ्यावर फिरला, कपड्यातून आत गुदगुल्या करून बाहेर पडला… त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं, चांदवा नुकताच आला होता. "बर्फी के टुकडे जैसा" अर्धवट खाल्ल्यासारखा, पिवळसर चमकदार! छान वाटत होतं त्याला, काहीतरी नवं गवसल्यासारखं…चंद्राकडे बघत तो कधी त्या पार्किंग मध्ये पोहोचला त्यालाच नाही कळलं!
Wills ची पिशवी bag मध्ये कोंबता कोंबता त्याने तिला न्याहाळून घेतलं. गोंडस कि काय म्हणतात ते, तशी होती ती. खांद्यापर्यंत मोकळे सोडलेले केस, गोऱ्या रंगावर खुलून दिसणारा गडद निळ्या रंगाचा Top. (सुबक बांधा देखील !) ती त्याच्याकडे बघणार एवढ्यात त्याने नजर काढून घेतली. "मी त्यातला नाही" अशा अविर्भावात गाडीचा starter मारून तो निघाला देखील. पण तिला मनात घोळवतच!
Gate पर्यंत पोहोचला आणि अचानक त्याचं लक्ष entry side ला गेलं. इन्शाल्ला ! पुन्हा तीच… यावेळेस तिनेही त्याच्याकडे बघितलं. त्याने थेट तिच्या डोळ्यात पाहिलं… काही क्षण सगळंच काही थांबलं होतं. जणू काही दोघांचे डोळे एकमेकांत lock झाले होते. असाच किती वेळ गेला कुणास ठाऊक? आणि मागच्या कपाळकरंट्या ने जोराचा होर्न दिला! स्वप्नातून जागा झाल्यासारखा तो दचकला.
आत्ताही तसाच दचकला! तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता, म्हणून तर इथे येउन बसला होता तो! पुन्हा एक झुळूक आली, पानं सळसळली. त्याला उगीच वाटलं की तिच्या perfume चा वास आला. स्वतःशीच हसला आणि उठला. गाडीवर बसून earphones कानात टाकले. आणि radio tune in केला , Radio वरची RJ आपल्या मधुर आवाजात काहीतरी सांगत होती,
"बऱ्याचदा सवांद साधायला बोलण्याची गरज नसते, खुपश्या गोष्टी डोळ्यांनीच बोलता येतात" आणि मग गाणं लागलं,
'आँखें भी होती है दिल की जुबान … '
No comments:
Post a Comment