Friday, 21 March 2014

अन्वय

मिटल्या डोळी हिरवी स्वप्ने
घेऊन आज आली
आधारली गे भित्तीवरती
नवखी जगास पालवी

वृक्ष मोठाले भिवविती
रोमरोमी वारा थरारे बापुडी
कुशीत घेऊन स्वप्नांना
रात्र रात्र झोप नाही...

पानोपानी अनुरागी
फुलली, बहरली, स्वतंत्र मनस्वी
अस्तित्व सिध्द कराया
खडकात उभी पाय रोवुनी...

प्रतिबिंब वाटे गे मजला
बावरी ती वल्लरी
हिरवी जशी तिची स्वप्ने
तशी माझी काळी शाई

भारलेली ही दुनिया
जीव-लेखणी फरक जाणी
कागदाइतुकेच माझे जग
नाहीतरी ती वेलही आहे एकाकी !

No comments:

Post a Comment