"कधीपासनं शोधतोय मी तुला. इथंच काय बघत बसलीस?" पाटील सर, काचेच्या आत ठेवलेल्या तलवारींकडे बघण्यात गुंग असलेल्या आमूवर खेकसले.
"मी ती माहिती..."
"चल आता माझा हात सोडलास तर बघ." असं म्हणून त्यांनी तिच्या छोट्या दंडाला पकडलं आणि तरा-तरा चालू लागले. "एका एका ठिकाणी थांबलं तर कसं होणार सगळं म्युझियम बघून?"
"असं बघून तरी काय उपयोग आहे!" आमू स्वतःशीच पुटपुटली. पाटील सरांबरोबर तिला पळावं लागत होतं. 'छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय' बघण्यापेक्षा ते 'कव्हर' करून परत मुंबई-दर्शन च्या गाडीत जाऊन बसतो', हा शुद्ध हेतू ठेऊन पाटील सर आमूला घेऊन बाहेर पडले होते. आमूच्या बाबांनी पूर्वी ते बघितल्यामुळे, "पाटील सरांबरोबर जा..." असं सांगून तिला धाडलं होतं.
'अखिल भारतीय विज्ञान संमेलन' साठी प्रत्येक जिल्ह्यातून काही शिक्षक आणि त्यांच्या मुलांना (प्रत्येकी एक) निमंत्रण होतं. बाबा आमूला घेऊन गेले होते. एकूण ३ दिवसांची ट्रिप होती. कुठल्या तरी बऱ्यापैकी हॉटेल मध्ये राहायची व्यवस्था होती. १८ मजली इमारत आमूने तेव्हा पहिल्यांदाच पाहिली होती. ऑडिटोरिअम मध्ये सायंटिस्ट लोकांचे लेक्चर्स चालायचे. ३ पैकी एक दिवस "Bhabha Atomic research center" ला भेट होती,जिथे लहान मुलांना आणि म्हाताऱ्यांना प्रवेश नव्हता, त्यामुळे तिचा एक दिवस बोअर होण्यात गेला. तिथल्या बाकीच्या मुलांशी बोलायची आणि मैत्री करायची तिच्यात हिम्मत नव्हती (तिला हत्ती आणि मुंगीचे ३-४ जोक सोडल्यास चांगले जोक्स पण येत नव्हते)
दुसऱ्या दिवशी ही 'मुंबई-दर्शनची' पायपीट. तिसऱ्या दिवशी अजून कसलंतरी संमेलन. आमू त्या वरा-वरा फिरण्याला चांगलीच वैतागली होती.
त्यात "म्हातारीचा बूट" हा काहीही जादुई बूट नसून केवळ बुटाच्या आकाराची इमारत आहे हे बघून तर ती फारच disappoint झाली होती. तिला हॉटेलात पोहचल्यावर लिफ्ट मधून वर जाताना मधेच 'डॉ. गोवारीकर' चढले, त्यांनी तिला बघून 'हाय' पण केलं. पण "She was done with the day!"
शेवटी रूम मध्ये जाऊन ती मुसमुसू लागली. पाय दुखत होते, थोडासा ताप आला होता. महत्वाचं म्हणजे "मूड गेला होता!"
बाबांनी हळूच एक पुस्तक काढलं, ओरिगामीचं. खालीच लागलेल्या प्रदर्शनात घेतलेलं. ते आमुसमोर ठेवलं आणि ते म्हणाले,
"तुला सादाको सासाकीची गोष्ट माहितीय?"
"नाही." गालावरचे छोटे २ थेंब तिने पुसले.
"जपान मध्ये हिरोशिमा-नागासाकी हल्ला झाला होता बघ?"
"हां... अणुबॉम्बचा!"
"हां... तर त्या हल्ल्यानंतर खूप वर्षांनी सुद्धा लोकांना 'रेडिएशन' मुळे त्रास होत राहिला.
"रेडिएशन म्हणजे?"
"रेडिएशन म्हणजे, अणुबॉम्ब टाकल्या नंतर खूप दिवस त्यातून एक प्रकारचे किरण बाहेर पडत राहतात. त्या किरणांच्या जवळ आलं तर ते सरळ आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि आपल्याला असे आजार होतात कि ते बरेच नाही होऊ शकत."
"बापरे... मग?"
"मग एक सादाको नावाची मुलगी होती, जपान मध्ये. तुझ्याएवढीच. तिला असा आजार झाला होता."
"मग?" पायाचं दुखणं ती विसरली होती.
"मग... अश्या आजार झालेल्या सगळ्या लोकांना एका हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आलं होतं. तर तिथे तिला पण एका कॉटवर झोपवण्यात आलं होतं." बोलता बोलता बाबांनी ते पुस्तक उघडलं आणि जवळच असलेला साधारण ४ इंचाचा कागदाचा तुकडा उचलला.
"मग?"
"मग बिचारी सादाको... तिला फार वेदना व्हायच्या. पण तरी सादाको रडकी नव्हती. ती सहन करायची. तिथल्या नर्स बायकांना ती आवडली होती. पण सगळेच तिच्या बद्दल हळहळायचे (बाबांचं ड्रॅमॅटिक व्हर्जन!). ती आता काहीच महिने जगणार होती. एवढ्या गोड आणि लहान मुलीला असा त्रास होताना बघून सगळ्यांना खूप वाईट वाटायचं." गोष्ट सांगता सांगता पुस्तकात बघून बाबा कागदाला घड्या घालत होते.
"मग काय झालं?"
""मग तिथल्या नर्सने तिला जपानमधली एक प्रथा सांगितली, 'जर एखाद्या व्यक्तीने ओरिगामीचे १००० क्रेन्स बनवले, तर त्याने मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते.' हे ऐकून सादाकोच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू पसरलं. तिने लगेचच ओरिगामीचे कागद मागवले. आणि क्रेन्स बनवायला सुरुवात केली. पण तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही, तिने 'जगाच्या शांती'साठी ते क्रेन्स बनवायला घेतले. युद्धामुळे लोकांचं आयुष्य उध्वस्त होतं, जसं आपलं झालं तसं पुन्हा कुणाचं होऊ नये म्हणून तिने क्रेन्स बनवायला घेतले (ड्रॅमॅटिक व्हर्जन!). पण तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती, शेवटी ती ६६४ क्रेन्स बनवू शकली आणि ती देवाकडे गेली."
बाबांनी आमूकडे बघितलं, तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं.
"हे बघ आता ह्या शेवटच्या दोन घड्यांमध्ये ह्या क्रेनचं डोकं तयार होईल." बाबा हातातला कागद दाखवून पुस्तकात बघून म्हणाले. त्या ४ इंची कागदापासून त्यांनी छोटा पोस्टकार्ड होल्डर बनवला होता. त्या होल्डरच्या मध्यावर एक क्रेनचं डोकं तयार होणार होतं.
"पण हा कागद इतका लहान आहे. नाही होणार बहुतेक"
"होय... खूपच लहान आहे कागद." आमू पुस्तकातल्या स्टेप्स बघून म्हणाली.
"चल आपण प्रयत्न करू. जर सादाको आपल्याकडे आता बघत असेल... तर हा क्रेन बनेल." बाबांनी सावकाश त्या ३ घड्या घातल्या आणि चक्क करंगळीच्या नखाएवढा तो क्रेन तयार झाला. आमूचे डोळे चमकले! तिला खूप आनंद झाला, ती चवड्यावर उड्या मारू लागली. बाबांनी ते कार्ड होल्डर मग पुस्तकात ठेऊन दिलं.
गादीवर आडवं पडून छतावर फिरणाऱ्या फॅनकडे बघत आमूने बाबांना विचारलं, "बाबा, कुणीपण १००० क्रेन्स बनवले तर जगात शांतता येईल?"
"मनापासून मागितलं तर येईल!"
"हां... मला घरी गेल्यावर क्रेन्स बनवायला शिकवा."

Touched!
ReplyDelete:)
ReplyDelete