Friday, 14 February 2014

Candle Light!!


           "म्हणे,  इतके दिवस काय केलं?? गोट्या नाही खेळल्या म्हणावं... कामच करतोयअरेजीव आहे की नाही आम्हांला? machine आहोत काय? म्हणायलाच हवं होतं, माश्या नाही मारल्या इतक्या दिवसांत, एखादं काम नाही झालं तर एवढं काय बोलता??"
           Office मधे देता आलेल्या प्रत्युत्तरांची उजळणी करत मी गाडीवरून चालले होते. अगदी पक्कं माहीत असून की ह्याचा काहीच उपयोग नसतो, उद्या पुन्हा ऑफिस मध्ये गेल्यावर "boss" नावाच्या प्राण्यासमोर तोंडाचं गाडगं करावंच लागणार असतं!
           पें  पें….  "अरे हलातुमच्या गुलुगुलु गप्पा घरी जाऊन करा . girlfriend ला मागं बसवलं की हे वीर कुठल्या सातव्या अस्मानावर असतात कुणास ठाऊक !" पारा अजूनच चढत होता. शक्य असतं तर मी त्या गाडीवाल्याच्या अंगावरून गाडी पुढे नेली असती.
       "लागला का सिग्नल? पटकन रूमवर जाऊन पडावं म्हणलं तर मध्ये हे सतरा signals! अरे, 9 वाजलेबंद पडा आता!!" पण 108 सेकंद थांबण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. शेवटी हतबल होऊन गाडी बंद करून दिली आणि पलीकडेच निवांत झोपलेल्या भिकाऱ्याकडे पाहत राहिलेत्या सिग्नल वर झोपलेल्या भिकाऱ्याचा मला आज चक्क हेवा वाटला. त्यांच्या गरजा पण कमी आणि कष्ट पण कमी. (पुढच्या जन्मात भिकारी व्हावं असा विचारही चमकून गेला !)
        Job हे एक नवीन पर्व सुरु झाल्यापासून हे असं बऱ्याचदा होतंसगळ्या changes शी cope करताना कधी कधी हरल्यासारखं होतं… Office मध्ये मनाविरुद्ध काही घडलं, की पार मेंदूचा कडेलोट होईपर्यंत विचार करायचा आणि मग असह्य झालं की डोळ्यांतले tank भरलेलेच असतात.
         आणि ज्या दिवशी हे माझ्या सहनशक्तीच्या ( जी अगदीच नगण्य आहे) पलीकडे जातं तेव्हा मी माझ्या 'थांब्या'वर जाते. हा "थांबा" म्हणजे अशी एक जागा आहे, जिथे 'दिल कि भडास' मनसोक्तपणे काढता येते, झालीच तर दोन टिपंही गाळता येतात. त्यानंतर जीव जरा थंड होतो.
        आजदेखील गेलेच मी माझ्या 'थांब्या'वर. तो वाट  बघत दारातच उभा होता. कसं काय देव जाणे पण माझा मूड गेलाय हे त्याला लगेच कळतं. त्याला बघितलं आणि डोळ्यांत पाणीच दाटलं. गाडी stand वर लावून मी तोंड उघडणार तेवढ्यात त्याने माझ्या तोंडावर बोट ठेवलंफक्त एकदा बघून nod केलं आणि माझे डोळे बंद करून त्याच्या खोलीत घेऊन गेला. तशी जरा भितीच वाटली मलाकितीही 'विश्वास' असला, तरी माझ्या रिकाम्या नसलेल्या डोक्यात बरेच सैतानी विचार चमकून गेले
        पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा मात्र मी उडायचीच बाकी होतेत्या छोट्याश्या खोलीत जणू स्वर्गच अवतरला होता. मेणबत्त्यांनी सजवलेली ती खोली पाहत मी कितीतरी वेळ नुसतीच उभी होतेछोट्याश्या Table वर पाण्यात तरंगणारी ती मेणबत्तीतिच्या पलीकडे दोन मोठ्ठाले ग्लास , champagne चा भास व्हावा म्हणून त्यात ओतलेलं Appy Fizz, पायात लुडबुडणारे छोटे छोटे फुगेगुलाबाची फुलं!! आहासगळंच स्वप्नवत!!
       खूप आदबीनं त्यानं मला खुर्चीवर बसवलं, plate मध्ये pizza चे pieces कापून दिले. ते Appy Fizz आता मला चढत होतं. बाहेरचं 'जालिम' जग जणू आता exist होत नव्हतं... फुलांच्या वासावरून तरंगत, मेणबत्तीच्या ज्योतीबरोबर डोलत तो नेहमीचा रटाळ पिझ्झा कधी संपला ते कळलंच नाही.
       आणि मग कुठूनसं हळू आवाजात गाणं लागलं… " पहली बार मोहब्बत की है…"  पटकन त्याच्याकडे पाहिलं, का कोण जाणे त्याच्या डोळ्यांत मी उगाचच स्वतःला सुंदर वाटले!
       मी नुसतीच स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत होतेएवढ्यात माझा हात हातात घेऊन, त्या सोनेरी शांततेत आपल्या धीरगंभीर आवाजाचं कोंदण लावत त्यानं विचारलं, "नीलू, माझ्याबरोबर म्हातारी होशील?"

       त्यानंतर, ‘नाहीम्हणायला जागाच कुठे होती आमच्या दोघांमध्ये!